कोळकी: तरुण विक्रम (विकी) रामभाऊ शेंडे यांचे निधन – परिसरात हळहळ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

कोळकी येथील सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ शेंडे यांचे सुपुत्र विक्रम (विकी) शेंडे यांचे वयाच्या ३० व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. आज दुपारी १२ वाजता कोळकीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

स्थैर्य, कोळकी, दि. १८ जून : कोळकी येथील सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ शेंडे यांचे सुपुत्र विक्रम (विकी) रामभाऊ शेंडे यांचे पहाटे वयाच्या ३० व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. या घटनेमुळे कोळकी आणि परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

विक्रम (विकी) शेंडे यांच्या पार्थिवावर फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दुपारी १२ वाजता त्यांच्या कोळकी येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.

तरुण वयातच विक्रम (विकी) यांच्यावर काळाने घाला घातल्याने शेंडे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Back to top button
Don`t copy text!