एका दिवसात 100 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्याने 100 टक्के नुकसान भरपाई द्या : मागणी


 

स्थैर्य, फलटण, दि.२१: अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने झालेले नुकसान प्रचंड असून आपद्गृस्त भागातील शेतकरी व सामाण्य माणूस अक्षरश: हदरुन गेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नुकसानीचे पंचनामे, अहवाल व नुकसान भरपाई याला विलंब होणार नाही याची दक्षता शासन,प्रशासनाने घेतली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत असताना एका दिवशी 65 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्यास तेथील नुकसानीची 100 टक्के भरपाई देण्याची तरतुद शासनाने केली असल्याच्या पार्श्‍वभूमीवर फलटण तालुक्यात त्यापेक्षा अधिक जवळपास 100 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला असल्याने येथील शेतकरी व सर्वसामान्यांना तातडीने संपुर्ण नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी व ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. 

शेतजमिनींची धूप हे कधीही भरुन न येणारे नुकसान : किंबहुना ती लुटच 


शेतजमिनीची धुप ही त्या शेतकर्‍याची अक्षरश: लुटच असल्याचे नमुद करीत अनेक शेतकर्‍यांनी पिढ्यंन पिढ्या या जमिनीत खत माती घालुन सदर जमिनी जपलेल्या असतात त्याचे जमिनीवर पुत्रवत प्रेम असते अशा परिस्थितीत नदी, नाले, ओढ्यांचे पूर व अतिवृष्टीने जमिनींची होणारी धूप ही न सोसणारी आहे. कारण उभ्या पीकांचे, फळबागांचे किंवा अन्य नुकसान भविष्यात भरुन निघू शकते परंतू जमिनीची धूप हे भरुन ने येणारे नुकसान असल्याने अशा शेतकर्‍यांचा शासन प्रशासनाने वेगळा विचार करुन त्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता असल्याचे अनेक शेतकर्‍यांनी बोलुन दाखविले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!