

विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छ. शाहू अकॅडमीने दहावी बोर्ड परीक्षेत १००% निकालाची चमकदार कामगिरी केली आहे. श्रेया वाघ हिने ९८.६० टक्के मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला असून, तब्बल ८८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे.
स्थैर्य, सातारा : दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेत विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ‘छत्रपती शाहू अकॅडमी’चा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील एकूण ८८ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवून या परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे.
शाळेतील गुणवंत विद्यार्थी :
-
प्रथम क्रमांक : श्रेया कुशल वाघ (९८.६०%)
-
विशेष कामगिरी: श्रेयाने गणित आणि संस्कृत या दोन्ही विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.
-
-
द्वितीय क्रमांक : अर्णव लक्ष्मण उबाळे (९८.४०%)
-
विशेष कामगिरी: अर्णवनेही गणित आणि संस्कृत या विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवून उत्कृष्ट यश संपादन केले आहे.
-
-
तृतीय क्रमांक : प्रांजली प्रमोद कांबळे (९७.००%)
मान्यवरांकडून कौतुकाची थाप :
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे. या यशाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, “सर्व विद्यार्थ्यांची अफाट मेहनत आणि शिक्षकांच्या समर्पित कार्यामुळेच शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.”
तसेच, सौ. वेदांतिकाराजे भोसले, शाळेच्या प्राचार्या सौ. डिंपल जाधव आणि सर्व शिक्षक वर्गाने यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.