निरगुडी: समशेरसिंह नाईक निंबाळकरांचा ठराव मंजूर – जिल्हा बँक निवडणूक

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी निरगुडी विकास सेवा सोसायटीतून नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

स्थैर्य, निरगुडी, दि. ०३ ऑगस्ट : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी संचालक मंडळ निवडणुकीसाठी (२०२६-२०३१) निरगुडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या वतीने फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा प्रतिनिधी म्हणून ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

या निवडणुकीसाठी मतदार, उमेदवार, सूचक आणि अनुमोदक म्हणून अधिकार देण्यासाठी सोसायटीच्या प्रतिनिधींची निवड करणे आवश्यक होते. त्यानुसार निरगुडी सोसायटीच्या बैठकीत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची शिफारस करून ठराव संमत करण्यात आला.

या ठरावासाठी शिवाजी पांडुरंग सस्ते यांनी सूचक म्हणून तर युवराज नरसिंग सस्ते यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे हा ठराव अधिकृतपणे सादर करण्यात आला असून, या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Back to top button
Don`t copy text!