
दैनिक स्थैर्य | दि. २६ जुलै २०२६ | फलटण |
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शेवटी राजीनामा दिला, पण लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्याचं काय? असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर आणि फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी यावरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.
धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फलटण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या.
ते म्हणाले की, शेतकर्यांच्या लेकरांचे भविष्य धोक्यात घातले आणि आता पळ काढला. ही जबाबदारी नव्हे, ही पळवाट आहे.पेपरफुटीच्या नावाखाली देशातील शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा केला आहे. गोरगरीब शेतकर्यांचा मुलगा कर्ज काढून शिक्षण घेतो, आणि सरकार त्याच्या स्वप्नांची होळी करते. राजीनामा हा अपुरा आहे. दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा मोफत देण्याची आमची मागणी आहे.