दिल्लीत इस्राइलच्या दुतावासाजवळ बॉम्ब स्फोट


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२९: दिल्लीमध्ये इस्राइलच्या दुतावासाजवळ बॉम्ब स्फोट झाला आहे. दुतावासाच्या इमारतीपासून 150 मीटर अंतरावर हा स्फोट झाला. या स्फोटात जीवितहानी झाल्याची माहिती नाही. पण, चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या स्फोटाचा तपास सुरू केला आहे. आज हा ब्लॉस्ट झाल्यामुळे चिंता वाढली आहे, कारण आजच भारत-इस्राइलच्या मैत्रीचा 29वा वर्धापन दिवस आहे.

सूत्रांनी सांगितले की, जिंदल हाउसजवळ एका फ्लॉवर पॉटमध्ये इम्प्रोवाइज्ड डिवाइस (IED) सापडला आहे. याला चालत्या गाडीतून तिथे टाकल्याची शक्यता आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ‘इस्राइलच्या दुतावासाजवळ एक लो इंटेंसिटी ब्लास्ट झाला आहे. सध्या या स्फोटाच्या कारणांचा शोध सुरू आहे. सध्या घटनास्थळी गुप्तचर विभाग आणि क्राइम ब्रांचचे अधिकारी दाखल झाले आहे. या परिसराला सध्या सील करण्यात आले आहे.

स्फोटाचा तपास NIA कडे सोपवला

दिल्लीतील अती सुरक्षित परिसरात झालेल्या ब्लस्टचा तपास NIA कडे सोपवण्यात आला आहे. तर, दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर विभागदेखील घटनास्थळी दाखल झाला आहे.

स्फोटापासून 1.7 किमी अंतरावर होते VVIP

लुटियंस झोनमध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोडवर इस्राइलच्या दुतावासाजवळ जिथे हा स्फोट झाला, तेथून विजय चौक फक्त 1.7 किलोमीटर अंतरावर आहे. विजय चौकात बीटिंग रिट्रीट चालू होती, त्यात राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री यांच्यासह अनेक VVIP उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!