
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १६ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण शहरातील वडार वसाहत येथे असणाऱ्या जय तुळजाभवानी उत्सव मंडळामधील अनेक युवा कार्यकर्त्यांनी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये आकाश माने, किरण माने, निखिल ननवरे, सागर देवकर, विशाल कुह्राडे, कुमार ननवरे, गणेश ननवरे, मयुर भिंगारे, रोहित चौगुले, सुनील वेताळ, गणेश विटकर, अक्षय गायकवाड, अनिल विटकर, सूरज माने, दत्तात्रय माने, उमेश पवार, गणेश गायकवाड, गौरव विटकर, भारत विटकर यांनी प्रवेश केला.
