पुण्यात तरुणाचा गोळ्या घालून खून

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, पुणे : पर्वती येथील शाहूनगर वसाहत येथे एका तरुणावर पिस्तुलातून गोळ्या घालून त्याचा खून केल्याचा प्रकार रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडला. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित मिलिंद सरोदे (वय २१, रा. जनता वसाहत, पर्वती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा मित्र सौरभ महेश मोहोळ (वय २१, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार आदर्श ननावरे, बोंबल्या आणि यशवंत कांबळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सौरभ हा अमितसोबत रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास शाहू वसाहत येथील बालाजी होलसेल येथे थांबले होते. त्यावेळी आरोपी ननावरे हा त्याच्या साथीदारासोबत त्या ठिकाणी आला. त्याने थेट अमित याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. तसेच, त्याच्या साथीदारांनी अमितच्या मानेवर, डोक्यात कोयत्याने वार केले.

यशवंत कांबळे याच्या सांगण्यावरून आरोपींनी गोळीबार व कोयत्याने वार केले आहेत. पुर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी तत्काळ दत्तवाडी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण, तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. आरोपींचा माग काढण्यासाठी स्थानिक व गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे हे अधिक तपास करत आहेत.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!