पुणे पदवीधर निवडणूक; फलटणमध्ये काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन, नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत फलटण येथील मतदान केंद्रावर काँग्रेस नेत्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत मतदानाचा हक्क बजावला.

स्थैर्य, फलटण, दि. २४ ऑक्टोबर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत फलटण येथील मतदान केंद्रावर काँग्रेसच्या वतीने मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. प्रदेश प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक सचिन सूर्यवंशी-बेडके आणि फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी-बेडके यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

शहराध्यक्षांची प्रमुख उपस्थिती

मतदान प्रक्रियेदरम्यान काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. सचिन सूर्यवंशी-बेडके आणि महेंद्र सूर्यवंशी-बेडके यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक पंकज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शक्तिप्रदर्शनामुळे मतदान केंद्रावर राजकीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!