
दैनिक स्थैर्य । 23 जून 2025 । फलटण । येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.
सुरुवातीला प्र. प्राचार्य प्राध्यापक पी. डी. घनवट यांच्या हस्ते योग शिक्षिका सौ. उषा धुमाळ यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
निरोगी शरीर तसेच स्वास्थ्य मनासाठी योगा अतिशय आवश्यक आहे. दररोज योग केल्याने शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते. योगाविषयी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने योगाचे आयोजन केले होते. सौ. उषा धुमाळ यांनी सूर्यनमस्कार, पद्मासन, गरुडासन, मयूरासन, वज्रासन या योग प्रकारांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या वेळी विद्यालयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी योगासने केली.
कार्यक्रमाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.ए. एस तांबोळी यांनी आर. डी. माने सूत्रसंचालन केले. प्रा. जी. बी. वाघ यांनी आभार मानले.