चौधरवाडीत माती परीक्षणासंदर्भात कृषीकन्यांतर्फे मार्गदर्शन


दैनिक स्थैर्य । 23 जून 2025 । फलटण । चौधरवाडी, फलटण येथे कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींनी शेतकर्‍यांना माती परिक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

या वेळी मंडळ कृषी अधिकारी शहाजी शिंदे, उप कृषीधिकारी अशोक जगदाळे, सहाय्यक कृषी अधिकारी सौ.तृप्ती शिंदे , प्रगतशील शेतकरी मुकुंद धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कृषीकन्यांनी शेतकर्‍यांना जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सातत्याने माती परीक्षण करावे तसेच माती परीक्षणातून उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्मअन्नद्रव्ये, सेंद्रिय कर्ब, जमिनीतील क्षारांचे प्रमाण याबाबत मार्गदर्शन केले. पीक काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी तीन महिन्यांनी मातीचा नमुना पाठवावा. जमिनीची एकरूपता, रंग, सुपीकता, खडकाळपणा, उंच सखलपणा लक्षात घेऊन वेगवेगळे भाग पाडून 5 ते 18 नमुना गोळा करावे याविषयी माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर , कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या सृष्टी जाधव, श्रेया लडकत, प्रणोती कांबळे, प्रतीक्षा मलगुंडे, कदम रोहिणी लक्ष्मण, स्नेहा काटकर, सानिका कांबळे आदी कृषी कन्या सहभागी झाल्या होत्या.


Back to top button
Don`t copy text!