येळे-काळे वस्तीवर श्री हनुमान-गोपाळकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा; रविवारी कलशारोहण सोहळा

खुंटे येथील येळे-काळे वस्तीवर श्री हनुमान व श्री गोपाळकृष्ण मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 11 सप्टेंबर : खुंटे येथील येळे-काळे वस्तीवरील श्री हनुमान व श्री गोपाळकृष्ण मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. हनुमान नवतरुण मंडळ आणि समस्त ग्रामस्थ खुंटे यांच्या वतीने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी भव्य मिरवणूक सोहळा

सोहळ्यानिमित्त शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून गणेशपूजन, वरुणपूजन, पुण्याहवाचन, जलयात्रा, मिरवणूक, देवता स्थापन आदी धार्मिक विधी होतील. दुपारी ४ ते ६ या वेळेत माहेरवासिनींचा मानपान सोहळा होणार असून, सायंकाळी ८ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्रह्मचैतन्य सुंदरगिरी महाराजांच्या हस्ते कलशारोहण

ब्रह्मचैतन्य सुंदरगिरी महाराज (पुरेगाव) यांच्या हस्ते दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी कलशारोहण होणार आहे. ह.भ.प. अमोल महाराज मुळ यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सायंकाळी ८ वाजता होणार आहे. सौ. सुजाता व सचिन बबनराव यादव आणि विजय अच्युतराव खलाटे यांच्या हस्ते कलशपूजन होणार आहे.

माहेरवासिनींना उपस्थित राहण्याचे आवाहन

येळे-काळे वस्तीवरील सर्व माहेरवासिनींनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वस्तीवरील नागरिकांनी आपल्या बहिणी व मुलींना या कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन उपस्थित राहण्यास सांगावे, तसेच इच्छेनुसार आर्थिक सहकार्य करावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Back to top button
Don`t copy text!