फलटण बाजार समितीत पिवळ्या मुगाला उच्चांकी दर; २० हजारांपर्यंत मजल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात पिवळ्या मुगाची उच्चांकी दराने विक्री झाली असून, या शेतीमालाला २० हजार रुपयांपर्यंत कमाल दर मिळाला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २५ ऑक्टोबर : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात पिवळ्या मुगाची उच्चांकी दराने विक्री झाली असून, या शेतीमालाला २० हजार रुपयांपर्यंत कमाल दर मिळाला आहे. रविवारी जाहीर झालेल्या घाऊक बाजारभावात विविध शेतीमालाची आवक आणि दर स्पष्ट झाले आहेत.

विविध शेतीमालाची आवक आणि दर

बाजार समितीच्या अधिकृत आकडेवारीनुसार, रविवारी भरलेल्या बाजारात विविध प्रकारच्या धान्य व कडधान्यांची आवक झाली. यामध्ये पिवळ्या मुगाचे दर सर्वाधिक १५ हजार ते २० हजार रुपयांपर्यंत नोंदवले गेले. तसेच इतर पिकांच्या दरांमध्येही मोठी चलबिचल पाहायला मिळाली.

बाजार समितीतील इतर पिकांची आवक आणि दर पाहता, ज्वारीला ३५०० ते १०००० रुपये दर मिळाला असून ६० क्विंटल आवक झाली. बाजरी ३००० ते ५१०० रुपये, गहू ३००० ते ४४०० रुपये, हरभरा ६००० ते ८१०० रुपये, मका २७०० ते ३००० रुपये, खपली ४५०० ते ५४५० रुपये, उडीद ७००० ते १०००० रुपये, हिरवा मुग ७००० ते १०००० रुपये आणि घेवडा ७००० ते ९००० रुपये या दराने विकला गेला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!