
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. ११ एप्रिल २०२३ | फलटण |
निंबळक (ता. फलटण) येथील श्री निमजाई देवीची यात्रा सालाबादप्रमाणे ११ व १२ एप्रिल रोजी होत आहे.
दि. ११ रोजी सायंकाळी ६.०० वाजता हळदीचा कार्यक्रम दि. १२ एप्रिल रोजी पहाटे ५.०० वाजता छबिना असतो. येथील पहिले राजा निंमरज यांनी श्री निमजाई देवीची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत त्यांच्या वंशजांना देवीच्या पूजेचा मान परंपरेनुसार दिला जातो, असे शंभूसिंग पृथ्वीराज नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
