फलटणमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा ४२ वा स्मृतिदिन; अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये चारही शाखांमार्फत यशवंतराव चव्हाण यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. 25 नोव्हेंबर : श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण आणि सौ. वेणूताई चव्हाण डी फार्मसी कॉलेज फलटण या चारही शाखांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा ४२ वा स्मृतिदिन २५ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला.

प्रतिमा पूजन आणि मान्यवरांची उपस्थिती

श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे उपाध्यक्ष सी. एल. पवार, संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली विक्रमसिंह भोसले, फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए. एम. घावटे आणि फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती यांच्या हस्ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आले.

श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी मनोगतातून स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला.

नियोजन आणि उपस्थिती

या कार्यक्रमासाठी चारही शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रशालेच्या प्राचार्या गायकवाड एन. एम. आणि उपप्राचार्य घनवट पी. डी. यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले, तर सूत्रसंचालन व आभार यादव एस. डी. यांनी मानले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!