आळजापूरमध्ये ग्रामस्थ व लकी ग्रुपतर्फे संविधान दिन साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

आळजापूर येथील संविधान चौकात ग्रामस्थ व लकी ग्रुपतर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला; प्रभातफेरी, अभिवादन व विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचे आयोजन.

स्थैर्य, आळजापूर, दि. 26 नोव्हेंबर : आळजापूर येथील संविधान चौकात ग्रामस्थ व लकी ग्रुप यांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी गावातून जिल्हा परिषद शाळा आळजापूर यांनी प्रभातफेरी काढली, त्यानंतर संविधान चौक येथे जिल्हा परिषद सदस्या किरणताई नलवडे यांनी स्तंभ व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

शाळा व ग्रामपंचायतीत उपक्रम आणि खाऊ वाटप

संविधान चौकातील अभिवादनानंतर ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गावातील युवक मित्र यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी संतकृपा उद्योग समूह संस्थापक विलासराव नलवडे, ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर काकडे, प्रकाश शिंदे, यशवंत शिंदे, अरुण काकडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राजक्ता नलवडे, उपाध्यक्ष भरत नलवडे, सोसायटी सचिव संदीप नलवडे, माजी सरपंच शुभम नलवडे, मनोज नलवडे, सुनील पवार, हणमंत नलवडे, सागर नलवडे, सुहास शिंदे, ग्रामसेवक जाधव अण्णा, मुख्याध्यापक संदीप खताळ, मोहन मसुगडे तसेच लकी ग्रुपचे सर्व सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!