दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) सातारा जिल्हा अध्यक्षपदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड झाल्याबद्दल फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटप केले.
यावेळी बुद्धवासी गणेश अहिवळे मित्र मंडळाचे प्रशांत अहिवळे व इतर सहकार्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पेढे वाटप व फटाक्यांची आतिषबाजी केली.