महिला व बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकरे आज फलटण दौऱ्यावर


दैनिक स्थैर्य । दि. 03 जानेवारी 2024 । फलटण । राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ना. आदिती सुनील तटकरे ह्या आज एकदिवसीय फलटण दौऱ्यावर येणार असून यामध्ये फलटणमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला व बालकल्याण मंत्री ना. आदिती सुनील तटकरे ह्या आज बुधवार, दि. ०३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता मुधोजी मनमोहन राजवाडा येथे येणार असून त्यानंतर दुपारी ३ वाजता फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित वर्किंग वुमन हॉस्टेल येथे सदिच्छा भेट देणार आहेत; त्यानंतर ना. तटकरे ह्या पुण्याकडे प्रस्थान करणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!