दैनिक स्थैर्य । दि. २४ मार्च २०२३ । मुंबई । भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उल्लेखनीय योगदान देणारे क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त आज मंत्रालयात महिला व बालविकास, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तिन्ही शहिदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, अवर सचिव विठ्ठल भास्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विजय शिंदे, चंद्रकांत काकडे यांनीही या वीरांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.