कोळकीत महिलेचे सोन्याचे गंठण लांबविले


दैनिक स्थैर्य । 23 जून 2025 । फलटण । अनंत मंगल कार्यालय ते नरसोबानगर, कोळकी, ता.फलटण सौ.शोभा सदानंद पाटणकर (वय 66 वर्षे) रा.नरसोबानगर, कोळकी यांच्या गळ्यातील 22 ग्रँम वजनाचे सोन्याचे गंठण मोटारसायकलवरुन आलेल्या अनोळखी इसमांनी हिसकावले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सौ.शोभा सदानंद पाटणकर (वय 66 वर्षे) या शुक्रवार (दि. 21) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अनंत मंगल कार्यालय ते नरसोबानगर येेथील रस्त्यारुन जात होत्या. त्यावेळी समोरून एका काळ्या रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या शाईन मोटारसायकल वरून दोन अनोळखी इसम आले.

त्यांच्याजवळ येताच त्यांनी गाडीचे स्पीड थोडे कमी केले. गाडीवर पाठीमागे बसलेल्या इसमाने सौ. पाटणकर यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले गाडीवरुन दहिवडीच्या दिशेने पळून गेले.

या चोरीची नोंद गुन्हा फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार अमोल रणवरे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!