
दैनिक स्थैर्य । 23 जून 2025 । फलटण । कोळकी येथील बुद्धविहार येथे बौद्ध महासभा, बुद्ध भीम संदेश अध्यापक गीतमंच संयुक्त विद्यमाने लंडन येथील नामांकित बँकेत उच्च पदावर कार्यरत असलेले मिलिंद अहिवळे, पराग लोंढे, पायलटपदी निवड झालेला संकेत अहिवळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास बौद्ध महासभेचे सातारा जिल्ह्याच्या पूर्व विभागाचे अध्यक्ष नानासो मोहिते अध्यस्थानी होते. यावेळी श्रीमंत घोरपडे, दादासाहेब भोसले, दत्ता अहिवळे, माजी प्राचार्य शिवाजी सावंत, अरुण गायकवाड, सिद्धार्थ अहिवळे, सुहास अहिवळे, घाडगे, ननावरे, अमोल काकडे, अरविंद निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कार मूर्तींचे शाल-पुष्पगुच्छ, मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.