
दैनिक स्थैर्य । 23 जून 2025 । फलटण । फलटण शहर पोलीसांनी शनिवार दि. 21 व रविवार दि. 22 रोजी पायी गस्त आणि नाकाबंदी दरम्यान नंबर प्लेट नसलेल्या मोटर सायकल वर कारवाईचा बडगा उगारला. गेल्या दोन दिवसात खालील प्रमाणे कारवाई केली आहे.
शुक्रवार दि. 21 रोजी पायी गस्त आणि नाकाबंदी दरम्यान 30 केसेस दाखल करून मोटार सायकल चालकाकडून 18 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. तसेच नंबर प्लेट नसलेले 9 केसेस दाखल करून 4 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला.
तसेच विमानतळ (पालखी तळ) येथे रविवार दि.22 रोजी पायी गस्त आणि नाकाबंदी दरम्यान नंबर प्लेट नसलेले 16 केसेस दाखल करुन10 हजार रुपये दंड वसूल केला. तसेच फॅन्सी नंबर प्लेटच्या 3 केसेस दाखल करून 2 हजार रुपये इतर 17 केसेस दाखल करुन 14 हजार रुपये दंड आकारण्यात आला.
या कारवाईत एकूण 36 केसेस दाखल केल्या. त्याद्वारे एकूण 26 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
तरी पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, चेहर्यावर रुमाल लावलेले, नंबर प्लेट नसलेले, डबल सीट असलेले मोटार सायकल स्वार दिसल्यास, त्याची माहिती 112 या टोल फ्री नंबर वर किंवा फलटण शहर पोलीस ठाण्यास द्यावी. सर्व दुचाकी मालकांनी आपल्या मोटर सायकल ला त्याचा नंबर लावावा.
विना नंबर प्लेट मोटार सायकलचा वापर अनेक गुन्हे करण्यात होत आहे. सर्वांनी नंबर प्लेट लावल्या तर चोरांची मोटार सायकल ओळखायला सोपे होणार असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.