पती व मुलीच्या खुनाची धमकी देत महिलेवर अत्याचार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १२: येथील एका उपनगरात राहणाऱ्या महिलेला तिचा पती व मुलींचा खुन करण्याची धमकी देत, तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पीडित महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात अमित शिवाजी बाबर (रा.सातारा) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित महिला शहरातील एका रुग्णालयात परिचारीका म्हणून काम करते. संशयिताचे तिच्या घरी येणे जाणे सुरू असायचे. दरम्यान एकेदिवशी संशयितांने तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडीतेने त्या कृत्याबाबत बाबर याला जाब विचारला असता तुझ्या नवऱ्याला व मुलीला मारून टाकीन अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर त्याने सतत अशीच धमकी देत, त्या महिलेवर वेळोवेळी अत्याचार केले. दि.9 रोजी पीडित महिला ही रुग्णालयात काम करत असताना संशयिताने तिथे जाऊन पीडितेला उध्देशून “”तू माझ्यासोबत चल”,असे म्हणून गोंधळ घालण्यास सुरूवात करून तिची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर दळवी हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!