दुधाच्या दरात वाढ; अमूलपाठोपानंतर मदर डेअरीचेही भाव वाढले, खिशावर पडणार भार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक झटका बसला असून, देशातील प्रमुख ब्रँड अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर २ ते ४ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. वाढलेली उत्पादन खर्च आणि पशुखाद्याच्या वाढलेल्या किमतींमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, नवीन दर आजपासून देशभरात लागू झाले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. १२ नोव्हेंबर : देशातील अग्रणी दूध उत्पादक कंपन्यांनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या किमतीत प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. यामुळे ग्राहकांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

वाढलेल्या किमतींचे स्वरूप

अमूल ब्रँडअंतर्गत विकल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात ४ ते ५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यानुसार, अमूल ताझा (टोन्ड दूध) च्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ झाली असून, अमूल गोल्ड प्रतिलिटर ४ रुपयांनी महाग झाले आहे. तसेच मदर डेअरीनेही आपल्या विविध दुधाच्या प्रकारांच्या किमतीत २ ते ४ रुपयांची वाढ केली आहे.

उत्पादन खर्च वाढल्याने निर्णय

कमी पाऊस आणि हवामानातील बदलांमुळे देशभरातील दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. याशिवाय हिरवा व सुका चारा, पशुखाद्य, पॅकेजिंग आणि इंधनाच्या खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. या दरवाढीमुळे मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नाचा मोठा वाटा थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!