
थेट WhatsApp वर मिळवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ६२ हजार ३७० कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंजुरी दिली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १२ नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय स्तरावर खतांच्या किमतीत झालेली वाढ आणि भू-राजकीय घडामोडींचा शेतकऱ्यांवर ताण येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रब्बी हंगामासाठी पीक आणि पाेषकद्रव्य आधारित (पीॲंडके) खत अनुदानाची ही नवी दररचना मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बाजारात सुलभ दरात खते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डीएपी खताचे दर स्थिर राहणार
या नव्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) च्या प्रति ५० किलो गोरीची किंमत १,३५० रुपयांवर कायम राखण्यात आली आहे. पश्चिम एशियातील संकट आणि रशिया-युक्रेन युद्धासारख्या जागतिक कारणांमुळे खतांच्या मूळ किमतीत मोठी वाढ झाली होती. मात्र, शासनाने पुरेशी सब्सिडी मंजूर करून शेतकऱ्यांचे आर्थिक हित सुरक्षित ठेवल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.





