वाईमध्ये मशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू


दैनिक स्थैर्य । दि.१६ फेब्रुवारी २०२१ । वाई। वाईच्या एमआयडीसी मधील गरवारे वालरुप्स कंपनीच्या नेट प्रोसेस विभागात सौ. छाया संतोष बोधे वय ३५ वर्ष रा. रविवार पेठ वाई यांचा मशीनच्या दोरीमध्ये पाय अडकल्याने त्या मशीनला वेग असल्याने दोरी सोबत त्या जमीनी पासून २० फुट ऊंचीवर असलेल्या मशीनमध्ये क्षणार्धात ओढल्या गेल्याने त्यांचा मशीन मध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेने कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

हा अपघात आज मंगळवार दि.१५ रोजी सकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या अपघाताची माहिती वाईचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी तातडीने अपघात स्थळावर जाऊन परिस्थितीची पाहणी करुन तपासाच्या सुचना दिल्या. मृत महिलेचा पतीही याच कंपनीत कामाला आहे. या झालेल्या भिषण अपघातामुळे गरवारे कंपनीतील कामगारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!