48.5 मिलियन डॉलरची कमाई करुन अक्षय कुमार ठरला जगातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता


 

स्थैर्य, दि.२४: अक्षय कुमार दरवर्षी बॉलिवूडला
सर्वाधिक चित्रपट देऊन चाहत्यांची मने जिंकत असतो. यासोबतच अक्षयने आता
जगातील सर्वाधिक कमाई करणार्‍या कलाकारांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
अक्षयने वर्षाला 48.5 मिलियन डॉलर (36२ कोटी रुपये) कमाई करून फोर्ब्सच्या
सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्याच्या टॉप 10 च्या यादीच सहावे स्थान
पटकावले आहे. या यादीमध्ये त्याने ग्लोबल स्टार शाहरुख खान आणि सलमानलाही
मागे टाकले आहे. 

उत्तर प्रदेशात ‘लव जिहाद’ विरोधात कायदा; आरोपीस 10 वर्षांची शिक्षा

एक नजर टाकुयात बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांवर…

अक्षय कुमार

बॉलिवूडचा
खिलाडी अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट नुकताच डिजिटल डिस्ने प्लस
हॉटस्टार व्हीआयपी वर रिलीज झाला आहे. विक्रम मोडत हा चित्रपट ओटीटी
प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक बघितला गेलेला चित्रपट ठरला आहे. आता अक्षय लवकरच
कृती सेनॉनसह ‘बच्चन पांडे’, सारा अली खान आणि धनुषसह ‘अतरंगी रे’, वाणी
कपूरसह ‘बेल बॉटम’ आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरसह ‘पृथ्वीराज’ या
चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटांव्यतिरिक्त प्रॉडक्ट एंडोर्समेंटमधूनही
अक्षयची कमाई होत असते.

सलमान खान

सुपरस्टार
सलमान खान दरवर्षी ईदच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी चित्रपटाचा
नजराणा घेऊन येत असतो. परंतु यावर्षी कोरोना आणि थिएटर बंद झाल्यामुळे तसे
होऊ शकले नाही. यंदा सलमानचा चित्रपट ‘राधे’ आणि ‘कभी ईद कभी दिवाली’ रिलीज
होणार होते पण चित्रपटांचे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही. अनलॉक होताच राधे
चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले, पण निर्माता अद्याप सिनेमागृह पूर्णपणे
उघडण्याची वाट पाहत आहेत. 2020 मध्ये एकही चित्रपट रिलीज न करताही सलमान
खान बॉलिवूडचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे. प्रत्येक
चित्रपटासाठी 100 कोटी रुपये घेणार्‍या या अभिनेत्याने बिग बॉस 14 साठी 450
कोटी रुपये घेतले आहेत.

शाहरुख खान

बॉलिवूडचा
किंग शाहरुख खान अखेर 2018 मध्ये रिलीज झालेल्या झिरो चित्रपटात दिसला
होता. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने फारशी चांगली कामगिरी केली नाही,
तरीदेखील शाहरुख बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा तिसरा अभिनेता आहे.
चित्रपटांव्यतिरिक्त शाहरुखचे प्रॉडक्शन हाऊस रेड चिली एंटरटेन्मेंट वेब
सिनेमा आणि मालिकांची निर्मिती करत आहे. शाहरुखने अलीकडेच दीपिका पदुकोणसह
पठाण चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

आमिर खान

वर्षाला
एक हिट चित्रपट देणारा आमिर खान लवकरच करीना कपूरसोबत लालसिंग चड्ढा या
चित्रपटात दिसणार आहे. लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचे शूटिंग रखडले होते, मात्र
सरकारकडून शूटिंगला परवानगी मिळाल्यानंतर अभिनेत्याने पुन्हा चित्रपटाचे
काम सुरू केले आहे. यावर्षी आमिरचा कोणताही चित्रपट रिलीज झालेला नसला तरी
यंदाच्या सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्याच्या यादीत तो चौथ्या
क्रमांकावर आहे.

अजय देवगण

2020
च्या सुरूवातीला तान्हाजी हा ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा अभिनेता अजय देवगण
बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा पाचवा अभिनेता आहे. या चित्रपटाची टक्कर
बॉक्स ऑफिसवर दीपिकाच्या छपाक या चित्रपटासोबत झाली होती. असे असूनही या
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 277 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.

हे आहेत जगातील सर्वाधिक कमाई करणारे कलाकार

87.5
मिलियन डॉलर कमाईसह ड्वेन जॉन्सन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर
रेयान रेनॉल्ड (71.5 मिलियन डॉलर), मार्क वाह्यबर्ग (58 मिलियन डॉलर), बॅन
अफ्लॅक (55 मिलियन डॉलर) आणि विन डीजल (54 मिलियन डॉलर) यांचा सर्वाधिक
कमाई करणा-या कलाकारांच्या यादीत टॉप 5 मध्ये समावेश आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!