
स्थैर्य, फलटण दि. २४ : श्रीराम सहकारी साखर कारखाना चालविणार्या श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाने यावर्षीच्या गळीत हंगामात आज अखेर 26 दिवसात 71379 मे. टन ऊसाचे गाळप करुन 73450 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा 10.42 % मिळाला आहे. श्री दत्त इंडिया प्रा. लि. साखरवाडीने 22 दिवसात 63196 मे. टन ऊसाचे गाळप करुन 61610 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा 10.35 % मिळाला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 23 दिवसात 1 लाख 58 हजार 243 मे. टन ऊसाचे गाळप करुन 1 लाख 41 हजार 300 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा 10.00 % मिळाला आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 28 दिवसात 1 लाख 53 हजार 615 मे. टन ऊसाचे गाळप करुन 1 लाख 51 हजार 350 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा 10.08 % मिळाला आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने 27 दिवसात 1 लाख 48 हजार 646 मे. टन ऊसाचे गाळप करुन 1 लाख 24 हजार 800 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा 9.34 % मिळाला आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने 13 दिवसात 91400 मे. टन ऊसाचे गाळप करुन 89850 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा 10.25 % मिळाला आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने 14 दिवसात 1 लाख 300 मे. टन ऊसाचे गाळप करुन 97290 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा 10.24 % मिळाला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने 17 दिवसात 18825 मे. टन ऊसाचे गाळप करुन 15225 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा 9.73 % मिळाला आहे. जवाहर सहकारी साखर कारखाना लि., हुपरीने 25 दिवसात 2 लाख 51 हजार 280 मे. टन ऊसाचे गाळप करुन 2 लाख 57 हजार 800 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सरासरी साखर उतारा 10.40 % मिळाला आहे.