
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २७ जुलै २०२४ | फलटण |
फलटण शहर पोलिसांनी रात्रगस्तीवेळी २६ जुलै २०२४ रोजी रात्री ३.३० वाजता बारामती पूल, फलटण येथे स्कूटरवरून निघालेल्या बालगुन्हेगारास पकडले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल फोन रु. ८४४/-, घरफोडी करण्यासाठी उपयुक्त ठरणारी हत्यारे व इंदापूरमधून चोरी केलेल्या स्कूटरसह (क्र. एमएच-१२-पीएस-८४३१) सुमारे ७७,०९४/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार पूनम वाघ करत आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पो.ह. नितीन सजगणे, महिला पो.ह. अनिता पानसरे आणि पोलीस शिपाई अतुल बढे यांनी केली.
