बांधकाम कामगारांच्या मुलांना संगणक तंत्रज्ञानचे शिक्षण देणार : रणधीर भोईटे


स्थैर्य, फलटण, दि. ०१ : बांधकाम व्यवसायामध्ये बांधकाम कामगार हे बांधकाम व्यवसायाचा कणा आहे. बांधकाम कामगारांच्या मुला-मुलींना संगणक व इतर तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळणे हे आताच्या डिजिटल जमान्यामध्ये गरजेचे आहे. हीच गरज ओळखून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने बांधकाम कामगारांच्या मुला-मुलींना संगणक शिक्षण मिळण्यासाठी एमएससीआयटी हा कॉम्पुटर कोर्स पूर्ण केल्यास त्या विद्यार्थ्याला बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया मदत करणार असल्याचे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या असोसिएशनचे चेअरमन रणधीर भोईटे यांनी जाहीर केलेले आहे.

बिल्डर्स असोसिएशन कडुन जागृती करुन बांधकाम कामगारांची नोंदणी करुन, विविध योजनांची माहिती पोहोचवून व प्रत्यक्षात मदत करुन आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केलेचे फलटण चेअरमन शफिक मोदी यांनी सांगितले. नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या अनेक योजना असुन बिल्डर्स असोसिएशन फलटण सेंटरने पुढाकार घेऊन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने यापुर्वी बांधकाम कामगारांचा मोठा मेळावा घेतला होता, याचा परिणाम म्हणुन खुप मोठ्या संख्येने कामगारानी नोंदणी केली होती. आज सातारा जिल्ह्यात जवळपास ३०,००० नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत.

यासाठी बिल्डर्स असोसिएशन ॲाफ इंडिया फलटण सेंटरचे चेअरमन शफिक मोदी व डॅा. बाबासाहेब आंबेडकर कॅाम्प्युटर इन्स्टीट्यूटचे शेखर कांबळे यांचेमध्ये करार करण्यात आला. यावेळी कामगार कल्याण मंडळ समन्वयक संदिप कांबळे, बिल्डर्स असोसिएशनचे राज्य खजिनदार किरण दंडिले, अभिजीत इंगळे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!