गौरव नष्टे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार ? श्रीमंत शिवरूपराजेंची भेट घेतली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 14 जानेवारी 2025 | फलटण | फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यार्थी सेलचे शहराध्यक्ष गौरव नष्टे यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आगामी निवडणुकांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समोर आले आहे. गौरव नष्टे यांनी फलटण शहरात मोठ्या प्रमाणात युवकांची फळी तयार केली असून, त्यांच्यासोबत शहरातील मोठा युवक वर्ग आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी सेलचे शहराध्यक्ष म्हणून गौरव नष्टे यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांची भेट घेतली. ही भेट आगामी फलटण नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

गौरव नष्टे यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष पद सांभाळत असताना फलटण शहरात मोठ्या प्रमाणात युवकांची फळी तयार केली आहे. त्यांच्यासोबत फलटण शहरातील मोठा युवक वर्ग आहे, जो त्यांच्या नेतृत्वात एकजुट झाला आहे. ही भेट फलटण नगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग मानली जात आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!