योग्य वेळी भूमिका जाहीर करणार : धैर्यशील मोहिते – पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 05 एप्रिल 2024 | फलटण | आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपली नेमकी काय भूमिका आहे ? याबाबत सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते धैर्यशील मोहिते – पाटील यांना छेडले असता योग्य वेळी योग्य भूमिका जाहीर करणार असल्याचे मत यावेळी धैर्यशील मोहिते – पाटील यांनी व्यक्त केले.

फलटण येथील युवा नेते सह्याद्री चिमणराव कदम यांच्या निवासस्थानी धैर्यशील मोहिते पाटील हे स्नेहभोजनासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

माढा लोकसभा मतदारसंघांमधून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का ? याबाबत विचारले असता येत्या काही दिवसात योग्य ती भूमिका जाहीर करणार आहोत असे मत धैर्यशील मोहिते – पाटील यांनी व्यक्त केले.

सह्याद्री चिमणराव कदम यांचे व आमचे जुने संबंध असून आज फलटण मधून जात असताना त्यांच्याकडे थांबून पुढे जात होतो; असेही धैर्यशील मोहिते – पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!