कोरोना प्रतिबंधक लस का घ्यावी ? व कुठली घ्यावी ?


स्थैर्य, फलटण, दि. ०४: सध्या आपण कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये अडकलो आहोत. कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत आणि त्याबरोबर मृत्यू दर पण वाढत आहे. आता बऱ्याच नागरिकांच्या मनामध्ये लसीबाबत विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत. कोरोना लस घेतली तरी सुद्धा कोरोना होण्याची श्यक्यता असेल तर लस का घ्यावी ? व कोणती घ्यावी ? या वर फलटण येथील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनी मार्गदर्शन केलेले आहे.

कोरोना पासून बचाव करायचा असेल तर त्रिसूत्री म्हणजेच मास्क, सामाजिक अंतर व सॅनिटायझेशन हे आपण सर्वांनी पाळलेच पहाणे. पण त्याहीपेक्षा जे आपल्याला सुरक्षा देणार आहे ते म्हणजे त्यावरील लस.

लस का घ्यावी ?
हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे की, लस घ्यावी की नाही, त्यामुळे मला कोरोना तर होणार नाही ना ? त्या मुळे मला काही इतर आजार तर होणार नाहीत ना ? पण लक्षात घ्या की, लस घेणे हा सध्या एकमेव उपाय आपल्या हातात उरलेला आहे. ती का घ्यावी याचे विश्लेषण करण्याआधी किती प्रकारच्या लसी आहेत त्याची आपण माहिती घेऊयात.

लस कोणती घ्यावी –
सध्या भारतात दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. कोव्हीशिल्ड जी की सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेली आहे. व दुसरी म्हणजे कोव्हेक्झिन जी की भारत बायोटेकने बनवलेली आहे.
सिरमने बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस चिंपांजी अडेनो व्हायरस पासून बनवलेली आहे. की जिचे स्पाईक प्रोटीन हे कोरोना व्हायरसशी संलघ्न आहेत आणि त्यामुळे येणारी प्रतिकार शक्ती ही कोरोना विरुद्ध लढण्यास उपयोगी ठरत आहे.

कोव्हेक्झिन ही लस क्षीण डेड कोरोना जंतूं पासून बनवलेली आहे. की जिच्या मुळे तुम्हाला कोरोनाच्या अँटिबॉडीज डायरेक्ट तयार होणार आहेत. सर्वात महत्वाचे दोन्ही लसी उत्तम आहेत आणि ते कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

जेव्हा आपण एखादी लस घेतो तेव्हा आपलेच शरीर त्या जंतूं विरुद्ध अँटिबॉडीज तयार करते आणि मग जरी आपल्याला जरी त्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तरी तरी त्या आजारापासून आपल्याला त्रास होत नाही.

लसीचे किती डोस घेणे आवश्यक –
दोन्ही पैकी कोठलीही लस घेतली तरी एकूण दोन डोस घेणे आवश्यक आहे. पहिल्या डोस नंतर दुसरा साधारण एक महिना ते दीड महिन्याच्या कालावधी मध्ये घ्यावा आणि मग त्यानंतर एक महिन्याने आपली प्रतिकार शक्ती चेक करावी. त्यासाठी कोविड आयजीजी अँटीबॉडीजसाठी सेरोसर्व्हिलेन्स हे करून घ्यावे. आणि त्याचा स्कोअर हा २० किंवा २० च्या वर येत असतो. ही प्रतिकार शक्ती किती दिवस टिकेल, तिसरा डोस घ्यावा लागेल की नाही अजून काही चित्र स्पष्ट नाही.

दोन्ही पैकी कोणतीही लस घ्या पण दोन्ही डोस एकाच प्रकारच्या लसीचे घ्या. म्हणजेच कोव्हीशिल्डचा पहिला डोस तर दुसरा डोस हा कोव्हीशिल्डचाच घ्यावा, कोव्हेक्झिनचा घेऊ नये, असे करणे घातक आहे किंबहुना त्याचा काही फायदा होणार नाही.

लस घेतल्यानंतर सुद्धा सर्वांनी सर्व प्रकारची काळजी घेणे अगदी जरुरीचे आहे. पहिला डोस झाल्यानंतर आपण पूर्णपणे सुरक्षित आहे हा भ्रम नसावा!
रोजचा व्यायाम, सकस आणि मोजकाच आहार, भरपूर पाणी पिणे हे इष्टच ! जशी माझे कुटुंब माझी जाबबदारी तसेच कोरोना लस घेणे ही माझीच जबाबदारी आहे हे प्रत्येकांनी ओळखले पाहिजे. लस घेतल्यानंतर अंग दुखणे, कणकण येणे , गळाठा होणे , थंडी वाजून येणे अशी लक्षणे १ ते २ दिवस दिसत आहेत की जी कोरोना झाल्यानंतर होणाऱ्या लक्षणांची सौम्य झलक आहे पण त्यापासून कोणतीही हानी काही नाही. कोरोना हा आपल्याबरोबर राहणारच आहे. आता आपल्याला त्याच्या बरोबर जगायला शिकले पाहिजे.

कोरोना पासून वाचायचे असेल ,
तर लसीकरण करावे हे महत्वाचे,
कुठलीही शंका आणू नका मनात,
घ्या लस पण वागू नका बिनधास्त

– डॉ. प्रसाद जोशी,
जोशी हॉस्पिटल प्रा. ली.,
अस्थीरोग, शल्यचिकित्सक, फलटण


Back to top button
Don`t copy text!