फलटण नगरपरिषदेची प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी जाहीर


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । फलटण । फलटण नगर परिषदेची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे. फलटण नगरपरिषद हद्दीमध्ये एकूण ४४ हजार ८४१ मतदार आहेत. गेले काही महिने ओबीसी आरक्षण व कोरोनामुळे नगरपरिषदेच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता राज्यामध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामध्ये प्रभाग रचना व प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली आहे.

प्रभाग क्र. १ मध्ये एकूण ३००७ मतदार असून त्यामध्ये १५४० पुरुष मतदार असून १४६७ स्त्री मतदार आहेत. प्रभाग क्र. २ मध्ये एकूण ३१३३ मतदार असून १५४१ पुरुष मतदार तर १५९२ स्त्री मतदार आहेत. प्रभाग क्र. ३ मध्ये एकूण ३०१८ मतदार असून १५३४ पुरुष मतदार आहेत तर १४८४ स्त्री मतदार आहेत. प्रभाग क्र. ४ मध्ये एकूण ३५८१ आहेत तर १७७५ पुरुष मतदार तर १८०३ स्त्री मतदार आहेत. प्रभाग क्र. ५ मध्ये एकूण ३२१६ मतदार आहेत तर १६६३ पुरुष तर १५५३ स्त्री मतदार आहेत.

प्रभाग क्र. ६ मध्ये एकूण ३७२४ मतदार आहेत त्यामध्ये १८५४ पुरुष तर १८७० स्त्री मतदार आहेत. प्रभाग क्र. ७ मध्ये एकूण ४३४७ मतदार आहेत त्यामध्ये २१६५ पुरुष तर २१८२ स्त्री मतदार आहेत. प्रभाग क्र. ८ मध्ये एकूण ३३१२ त्यामध्ये १६६२ पुरुष तर १६५० स्त्री मतदार आहेत. प्रभाग क्र. ९ मध्ये एकूण ३७२८ मतदार आहेत त्यामध्ये १८२३ पुरुष तर १९०५ स्त्री मतदार आहेत. प्रभाग क्र. १० मध्ये एकूण ३७४० मतदार आहेत त्यामध्ये १८६३ पुरुष तर १८७७ स्त्री मतदार आहेत. प्रभाग क्र. ११ मध्ये एकूण ३७६५ मतदार आहेत त्यामध्ये १८७५ पुरुष तर १८९० स्त्री मतदार आहेत. प्रभाग क्र. १२ मध्ये २०७५ एकूण मतदार आहेत त्यामध्ये १०९० पुरुष तर ९८५ स्त्री मतदार आहेत. प्रभाग क्र. १३ मध्ये एकूण ४१९५ मतदार आहेत त्यामध्ये २१२५ पुरुष तर २०७० स्त्री मतदार आहेत.


Back to top button
Don`t copy text!