स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लेखी नोटीस देऊनच शाळेची इमारत उतरवली वाई ब्राम्ह समाज (प्रार्थना संघ) च्या अध्यक्षा प्रियांका साबळे यांची पत्रकार परिषदेत माहिती

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 18, 2021
in सातारा - जावळी - कोरेगाव
ADVERTISEMENT

स्थैर्य, सातारा, दि.१८: वाई ब्राम्ह समाजाच्या 1486 रविवार पेठ येथील जवळपास 150 वर्षे जुन्या इमारतीत भरविण्यात येणारी शाळा इमारत धोकादायक बनल्याने नोटीस बजावून तेथील वर्ग बंद करण्यात आले. यामध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हायस्कूल येथील विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान करण्याचा हेतू नाही. धोकादायक इमारत असल्याने केवळ जीवित हानी टाळणे हाच हेतूने इमारत उतरवण्याचा निर्णय घेतल्याचा दावा वाई ब्राम्ह समाज संघटनेच्या अध्यक्षा प्रियांका साबळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

वाई ब्राम्ह समाज संस्थेच्या वतीने 1486 रविवार पेठ येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हायस्कूलला जागा भाडयाने देण्यात आल्याचा दावा संस्थेने करून करार संपण्यापूर्वीच शाळेची इमारत साहित्य बाहेर काढून पाडण्यात आल्याचा आरोप केला होता. शाळेने या संदर्भात खाजगी स्वरूपाची तक्रार केल्याने वाई ब्राम्ह समाजाच्या अध्यक्षा प्रियांका साबळे यांनी सातार्‍यात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.

प्रियांका साबळे याबाबत म्हणाल्या, वाई येथील ब्राम्ह समाजाची इमारत ही धोकादायक बनल्याने वाई नगरपालिकेने 7 ऑगस्ट 2019 रोजी नोटीस बजावली होती. ब्राम्ह समाजाने वेळोवळी संस्थेशी पत्रव्यवहार करून इमारत धोकादायक झाली असून आपण गर्ल्स हायस्कूलचे दोन वर्ग व शालेय साहित्य इतरत्र हलवावे अशा लेखी सूचनादेखील केल्या होत्या. या संदर्भात संस्थेशी पुन्हा पत्रव्यवहार करून शाळा मुख्याध्यापकांची सुद्धा भेट घेतली. तसेच ब्राम्ह समाजाच्या कार्यवृत्तांत अहवालामध्येही शिक्षण विभाग, वाई पोलीस स्टेशन, वाई नगर परिषद यांना पत्र देऊन वर्ग भरविण्यास मनाई करावी, अशा मंजूर ठरावाची नोंद आहे.

ब्राम्ह समाजाने धोकादायक इमारतीचा पत्रा काढला असून धोकादायक भाग टप्याटप्प्याने काढण्याची तयारी केली आहे. गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनींचे नुकसान होऊ नये व जीवित हानी टाळली जावी, हाच आमचा हेतू आहे. इमारतीचे पत्रे काढले जात असताना संस्थेच्या कर्मचार्‍यांनी शाळा इमारत पाडल्याचा जो स्टंट केला तो दिखावा आहे. संस्थेची वाई शहरात इतरत्र इमारत असतानाही काही विशिष्ट हेतूने तेथे जाणीवपूर्वक वर्ग भरविले जातात. यामागे असणार्‍या हालचालीचा आम्ही शोध घेत असून या संदर्भात आमची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पदाधिका यांशी चर्चा सुरू आहे. प्रार्थना समाजाने इमारत उतरविण्याचे काम नियमानुसारच केले आहे, त्याचा कोणी गैर अर्थ लावू नये असा इशारा प्रियांका साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.


ADVERTISEMENT
Previous Post

उद्या चेन्नईत होणार लिलाव; पाहा कोणत्या टीमकडे किती जागा, रक्कम शिल्लक

Next Post

चर्चा तर होणारच : दोन्ही राजेंनी घेतल्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी

Next Post

चर्चा तर होणारच : दोन्ही राजेंनी घेतल्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी

ताज्या बातम्या

फरांदवाडी कृषिक्रांती कंपनीच्या ग्रेडिंग युनिटचा तालुक्यातील शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा : फिरोज शेख 

March 4, 2021

सातारा पालिकेकडून दोन ठिकाणी कोवीड लसीकरणाची सोय

March 4, 2021

फिटनेस टेस्ट घेताना रिक्षाला अपघात आरटीओ कार्यालयातील घटना : वाहन निरीक्षक जखमी

March 4, 2021

उपसरपंचांचा बंद बंगला फोडला, 2 लाखाचा ऐवज लंपास

March 4, 2021

संपतराव भोसले व पोपटराव भोसले या पिता-पुत्रांचे एकाच दिवशी निधन; राजाळे गावावर शोककळा

March 4, 2021

विक्रम भोसले अजितदादा पवारांच्या भेटीला;विकासकामांसाठी सर्वतोपरी सहकार्याचे दिले आश्‍वासन

March 4, 2021

आता 24 तासात कधीही, तुमच्या सोयीनुसार कोरोना लस घ्या! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

March 3, 2021

चाैथ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा कसून सराव, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर नजर

March 3, 2021

‘कनेक्शन तोडून नाही तर हात जोडून महावितरण करणार थकीत वीज बिलाची वसुली

March 3, 2021

सोने स्वस्त : मागणी घटल्याने सात महिन्यांत सोने 10,887 रुपये स्वस्त; 56 हजारांचा टप्पा गाठून 45 हजारांपर्यंत घट

March 3, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.