प. पू. श्री गोविंद महाराज उपळेकर समाधी सोहळा उत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १३ सप्टेंबर २०२४ | फलटण |
प. पू. श्री गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्था लक्ष्मीनगर, फलटणच्यावतीने ‘श्रीं’च्या ५० वा समाधी सोहळा उत्सवानिमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार, १८ सप्टेंबर ते बुधवार २५ सप्टेंबर २०२४ दरम्यान साजरा होणारा आहे.

श्री ज्ञानेश्वरी पारायणाचा शुभारंभ बुधवार दि. १८/०९/२०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता संस्थेच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजनाने होईल.

या अखंड हरिनाम सप्ताहातील श्री ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ ह.भ.प. सौ. पुष्पाताई कदम, फलटण या भूषवतील, तर पखवाज वादक ह.भ.प. हणमंत महाराज कुंभार, मुंजवडी (फलटण)व ह.भ.प. सोमनाथ महाराज घोगरे शिंदेवाडी (ता. माळशिरस) हे असणार आहेत.

सप्ताहात गायकवृंद म्हणून ह.भ.प. ईश्वर महाराज माने – साठे (फलटण), ह.भ.प.सचिन महाराज देशमुख – हणमंतवाडी (फलटण), ह. भ. प. गोपाळ महाराज घोगरे – शिंदेवाडी (माळशिरस), ह.भ.प.नंदकुमार महाराज कुमठेकर – सासवड (फलटण), ह.भ.प.जयवंत महाराज भोईटे – हिंगणगाव (फलटण), ह.भ.प.पोपट महाराज भोसले – अनपटवाडी (खटाव), ह.भ.प. कपिल महाराज चव्हाण – गोखळी (फलटण), ह.भ.प. भिमराव नाना शिंदे – ताथवडा (फलटण) व ह.भ.प.बाबा महाराज शिंदे – पिंप्रद (फलटण) हे असणार आहेत.

या सोहळ्यास फलटण शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी केले आहे.

सोहळ्याचा कार्यक्रम असा :


Back to top button
Don`t copy text!