
दैनिक स्थैर्य । दि. ११ जून २०२२ । मुंबई । पावसाळ्यात रेल्वे सेवा सुरळीत सुरू राहावी, दुरूस्तीची कामे वेळोवेळी पूर्ण व्हावीत, लोकल गाड्यांची संख्या व वेळा प्रवाशांच्या सोयीनुसार असाव्यात आणि एसी लोकलची संख्या वाढवावी, एस्केलेटर्सची संख्या वाढवावी व नादुरूस्त एस्केलेटर्स दुरूस्त करावेत अशा अनेक रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित, मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, आयटी व सोशल मीडिया इनचार्ज समीर गुरव, रेल्वे बोर्डाचे सदस्य जय नागवानी व प्रोटोकॉल सदस्य संतोष पांडेय उपस्थित होते.