जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग,  ३ हॉटेलवर बोरगाव पोलिसांची कारवाई


 

स्थैर्य, सातारा, दि.२९: कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व्यवसायासाठी निर्बंध घालूनही वेळेनंतर हॉटेल उघडे ठेवून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आशियाई महामार्गावरील वळसे (ता.सातारा) येथील तीन हॉटेल्सवर बोरगाव पोलिसांनी कारवाई केली.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे १२.१५ च्या सुमारास बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना महामार्गावरील वळसे गावच्या हद्दीत जिल्हाधिकाऱ्यानी विहित केलेल्या वेळेनंतरही दोन हॉटेल व एक चहा टपरी उघडी असल्याचे आढळले.

पोलिसांनी वळसे येथील हॉटेल इंद्रराजचा चालक नारायण आनंदराव कदम (रा.वळसे),हॉटेल राजधानी पेलेसचा चालक अमित बजरंग कदम (रा.शेंद्रे),हॉटेल अनुश्री समोरील टपरी चालक प्रवण शंकर काकडे (रा. बोरगाव) व कामगार समीर जयवंत पडवळ( रा.भरतगाव) यांच्याविरुद्ध भा.दं. वि.स कलम १८८,आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र कोव्हिडं विनियमन कलम ११ व साथरोग प्रतिबंधक अधिनियम १९८७ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!