गोखळी येथे २७ रोजी मोफत दंतचिकित्सा व निदान उपचार शिबिर


दैनिक स्थैर्य | दि. २६ जुलै २०२४ | फलटण |
भारती हॉस्पिटल व डेंटल क्लिनिक (फलटण) व गोखळी ग्रामपंचायत यांच्या विद्यमाने शनिवार, दि. २७ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य मोफत दंतचिकित्सा व निदान उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरामध्ये पुढील उपचार पध्दतीवर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व उपचार सवलत दिली जाणार आहे, असे डॉ. सौ. पूजा म. शिंदे यांनी सांगितले.

शिबिरामध्ये प्रामुख्याने दात काढणे, कवळी बसवणे, रुट कॅनाल स्टेटमेंट, कृत्रीम दंतरोपण, डिजिटल एक्स रे, दंत तपासणी, वेडीवाकडे दात काढणे, अक्कल दाढ काढणे, दातांमध्ये चांदी सिमेंट भरणे, इतर शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात काढणे, तोंडातील सर्व प्रकारचे चट्टे, सर्व रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टर्समार्फत मोफत तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.

या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन गोखळी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. सुमनताई गावडे (सवई) यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!