
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ११ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील पत्रकार अरविंद मेहता यांचे चुलत बंधू विनोद उर्फ बंडूशेठ पितांबर मेहता (रा. पिंपळगाव, ता. दौंड) यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी पुणे येथील रुग्णालयात अल्पकालीन आजारावर उपचार सुरू असताना सोमवार, दि. 9 रोजी अकस्मात निधन झाले.
राहू-पिंपळगाव परिसरातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी पिंपळगाव येथील राहत्या घरी बंडूशेठ मेहता यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन मेहता कुटुंबियांचे सांत्वन केले.
राहत्या घरापासून निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट, मित्रमंडळी, पिंपळगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहभागी झाले होते.
मुळा-मुठा नदीच्या काठावर, सिदोबा पाणवठा येथील पिंपळगाव ग्रामपंचायतीने उभारलेल्या स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
