
थेट WhatsApp वर मिळवा
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फलटण मुख्य बाजारात रविवारी विविध शेतीमालाची आवक झाली असून, यामध्ये मका आणि गव्हाची आवक सर्वाधिक नोंदवली गेली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १५ नोव्हेंबर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फलटण मुख्य बाजारात रविवारी शेतीमालाची आवक व घाऊक दर जाहीर झाले आहेत. यामध्ये विविध धान्यांची आवक आणि त्यांचे दर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून, बाजारात शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी व्यापाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
बाजारभावातील प्रमुख घडामोडी
फलटण मुख्य बाजारात मक्याची ३३० क्विं. आवक झाली असून २८०० ते ३२00 रुपये दर मिळाला आहे. तसेच गव्हाची २९० क्विं. आवक होऊन भाव २९५० ते ४०५० रुपयांपर्यंत नोंदवला गेला. बाजरीची २३० क्विं. आवक होऊन भाव २६०० ते ४५०० रुपये इतका राहिला. ज्वारीची ५५ क्विं. आवक होऊन दर ४००० ते १३१०० रुपयांपर्यंत दिसून आले.
हरभरा आणि डाळींचे दर
बाजारात हरभऱ्याची १२२ क्विं. आवक होऊन ६५०० ते ७५५० रुपये दर मिळाला. उडदाची २७ क्विं. आवक झाली असून ८५०० ते ९३०० रुपये भाव नोंदवला गेला. हिरव्यामुगाची ५ क्विं. आवक होऊन ७००० ते ९५०० रुपये दर मिळाला, तर पिवळामुगाचे दर १३००० ते १५५०० रुपयांदरम्यान राहिले. तसेच घेवड्याची १६८ क्विं. आवक नोंदवून ७००० ते ९१५० रुपये दर मिळाला आहे.





