आरक्षण मिळेपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी; बरड गावचा निर्णय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
सकल मराठा समाजाला टिकणारे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना गावामध्ये प्रवेश बंद करीत असल्याबाबतच्या निर्णयाचे पत्र जिल्हाधिकार्‍यांना बरड ग्रामपंचायतीने दिले आहे.

या पत्रात ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांनी म्हटले आहे की, गेली ४० वर्षे मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. अनेक सरकारे आली आणि गेली; परंतु गोरगरीब मराठा समाजाला राजकीय नेते आरक्षण देऊ शकले नाहीत. आज मराठा समाज आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे. तरीही सरकारला जाग येत नाही. मनोज जरांगे पाटील यासाठी आमरण उपोषणास बसले आहेत. हा लढा आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. यामध्ये आम्हीही सहभागी झालो असून बरड गावामध्ये सर्व राजकीय नेत्यांना प्रवेश बंद करीत आहोत. या भूमिकेला सर्वांनी सहकार्य करून मराठा आरक्षणाचा प्रश्न कोणताही वेळ न घालवता सोडवावा, असे पत्रात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!