फलटणमध्ये बालनिमित्त नेहरूंच्या अर्धपुतळ्यास आदरांजली; नगरपरिषदेच्या वतीने पुष्पहार अर्पण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

बालदिनाचे औचित्य साधत फलटण येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अर्धपुतळ्यास नगरपरिषदेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

स्थैर्य, फलटण, दि. १४ नोव्हेंबर : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आणि बालदिनाचे औचित्य साधून फलटण शहरामधील त्यांच्या अर्धपुतळ्यास फलटण नगरपरिषदेच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी नगरपरिषदेच्या वतीने थोर नेत्याच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरपरिषदेच्या नगरसेविका सिद्धाली शहा यांच्यासह फलटण नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालदिनानिमित्त आयोजित या आदरांजली कार्यक्रमात उपस्थितांनी पंडित नेहरूंच्या बालप्रेम व देशाच्या जडणघडणीतील योगदानाचे स्मरण केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!