विक्रम गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे मापदंड प्रस्थापित केले. हिंदी व मराठी चित्रपट तसेच रंगभूमीवर प्रदीर्घ काळ काम करताना त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. काही चित्रपट व नाटके केवळ त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे लोकांच्या लक्षात आहेत. सामाजिक प्रश्नांवर देखील गोखले यांनी आपली मते निर्भीडपणे मांडली. अलीकडेच दिनांक 15 ऑगस्ट रोजी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली, परंतु दुर्दैवाने ती भेट शेवटची ठरली. या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!