

स्थैर्य, विडणी, दि. ४ जून : विडणी (ता. फलटण) येथील श्री सद्गुरू शिवाजी महाराज मंदिरात, पुरुषोत्तम (अधिक) मासाच्या पवित्र निमित्ताने श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन व श्री शंकर गीता पारायण सोहळ्याचे येत्या रविवारी (दि. ७ जून २०२६) भव्य आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा:
-
सकाळी १०.०० वाजता: श्रींच्या पादुकांचे आगमन
-
सकाळी ११.०० वाजता: श्रींच्या पादुकांना अभिषेक
-
दुपारी १२.०० वाजता: आरती
-
दुपारी १.०० वाजता: श्री शंकर गीता पारायण सोहळ्यास सुरुवात (या पारायणासाठी व्यासपीठ चालक म्हणून सौ. उर्मिलाताई निवंगुणे या उपस्थित राहणार आहेत.)
-
सायंकाळी ५.३० वाजता: श्रींची महाआरती आणि त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन.
आयोजक व निमंत्रक:
या सोहळ्याचे आयोजन श्री. मिलिंद कदम (सांगवी, बारामती), श्री. निखिल ऊर्फ बाबूदादा वाघमारे (धनकवडी, पुणे) आणि श्री. जयवंत कर्वे (विडणी मंदिर) यांनी केले आहे.
तर, निमंत्रक म्हणून श्री दत्त सेवेकरी मंडळ (सांगवी, बारामती), ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळ (फलटण), ॐ दत्त चिले भजनी मंडळ (मोर्वे), श्री स्वामी समर्थ सेवा भजनी मंडळ (फलटण) आणि श्री सद्गुरू शंकर महाराज भजनी मंडळ (धनकवडी, पुणे) हे असणार आहेत.
भाविकांना आग्रहाचे आवाहन:
या भव्य आणि दिव्य अशा पारायण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक भाविकांनी मिलिंद दादा कदम (मो. ९५५२७११७७७) किंवा निखिल (बाबूदादा) वाघमारे (मो. ८३०८४०५०१७) यांच्याशी संपर्क साधावा. तरी, जास्तीत जास्त भाविकांनी या पारायण सोहळ्यात सहभागी होऊन श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.