वाहनधारकांसाठी महत्त्वाचा बदल; ‘पीयूसी’ प्रमाणपत्राची नवी मुदत निश्चित, बीएस-६ वाहनांना मोठा दिलासा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

वाहनांचे वय आणि उत्सर्जन मानकांनुसार पीयूसी प्रमाणपत्राच्या वैधतेत केंद्र सरकारने मोठा बदल केला असून, बीएस-६ वाहनधारकांना तीन वर्षांपर्यंत दिलासा मिळाला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २० नोव्हेंबर : वाहनांमधून होणाऱ्या वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेवतानाच नवीन वाहनधारकांवरील तांत्रिक भार कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रदूषण नियंत्रण (पीयूसी) प्रमाणपत्राच्या वैधता कालावधीत मोठा बदल केला आहे. वाहनाचे वय आणि त्याचे उत्सर्जन मानक (बीएस श्रेणी) यानुसार आता पीयूसी प्रमाणपत्राची मुदत निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आली आहे.

जुन्या आणि नव्या वाहनांसाठी वेगवेगळी वैधता

नव्या तरतुदीनुसार, बीएस-१, बीएस-२ आणि बीएस-३ श्रेणीतील जुन्या वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्राची वैधता केवळ तीन महिने, तर बीएस-४ वाहनांसाठी सहा महिने इतकी असेल. दुसरीकडे, बीएस-६ खासगी (बिगर-वाहतूक) वाहनांसाठी पहिल्या नोंदणीपासून सहा वर्षांपर्यंत तीन वर्षे, सहा ते दहा वर्षांसाठी एक वर्ष आणि दहा वर्षांनंतर सहा महिने वैधता लागू राहील. तर बीएस-६ व्यावसायिक वाहतूक वाहनांसाठी हा कालावधी अनुक्रमे दोन वर्षे, एक वर्ष आणि सहा महिने असा निश्चित करण्यात आला आहे.

नूतनीकरणाबाबतचे महत्त्वाचे नियम

या सुधारणेपूर्वी जारी करण्यात आलेल्या पीयूसी प्रमाणपत्रांना ही नवीन मुदत त्यांच्या पहिल्या नूतनीकरणापासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे, प्रमाणपत्राची मुदत संपण्याच्या दहा दिवस आधी नूतनीकरण केल्यास नवीन प्रमाणपत्राची वैधता जुन्या प्रमाणपत्राच्या समाप्तीच्या तारखेपासून सुरू होईल. मात्र, मुदत उलटून गेल्यानंतर नूतनीकरण केल्यास ती नूतनीकरणाच्या दिवसापासून ग्राह्य धरली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!