
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण येथील श्रीराम मंदिराचे पुजारी वसंत सदाशिव पेटकर यांचे पुणे येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने भाविकांमधून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १२ नोव्हेंबर : फलटण येथील श्रीराम मंदिराचे पुजारी वसंत सदाशिव पेटकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी पुणे येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 2 वाजता पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वसंत पेटकर यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
श्रीराम मंदिरातील त्यांच्या सेवेमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना होती. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





