
थेट WhatsApp वर मिळवा
दिवाळीच्या पावन पर्वावर जगातील सर्वात तरुण नगरसेविका सिद्धाली शहा यांनी संत महात्म्यांचे औक्षण करून आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत यंदाची भाऊबीज अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरी केली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १२ नोव्हेंबर : दिवाळीनिमित्त प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत तसेच संत महात्म्यांच्या उपस्थितीत भाऊबीज साजरी करत जगातील सर्वात तरुण नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांनी एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. संत महात्म्यांनी या अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करत त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन
या दौऱ्यादरम्यान सिद्धाली शहा यांनी फलटण शहरातील नागरिकांनी अत्यंत मेहनतीने तयार केलेल्या विविध किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व कलाकारांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. कलाकारांनीही त्यांचे स्वागत करून तयार केलेल्या किल्ल्यांची सविस्तर माहिती दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आगामी वर्षात किल्ले स्पर्धा आयोजित करण्याचे आपले मानस असल्याचेही जाहीर केले.





