दैनिक स्थैर्य | दि. १८ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
सद्गुरू हरिबाबा महाराजांच्या १२५ व्या समाधी सोहळा एकादशीनिमित्त मंगळवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत श्री सद्गुरू हरिबुवा महाराज यांना लघुरुद्र अभिषेक, १०.३० वाजता मंदिर परिसरातील बांधकाम नूतनीकरण भूमिपूजन समारंभ आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (चेअरमन, श्री सद्गुरू हरिबुवा साधू देवस्थान ट्रस्ट, माजी सभापती, महाराष्ट्र राज्य विधान परिषद) यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण), श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (माजी अध्यक्ष, जि. प. सातारा), आ. दिपकराव चव्हाण यांच्या व भाविक भक्तांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळाची भजन सेवा, ३ ते ५ दादा महाराज भजनी मंडळाचे भजन तसेच सायंकाळी ५.३० ते ७ वाजेपर्यंत ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळाचे सुश्राव्य असे भजन होणार आहे.
बुधवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत काल्याचे भजन होऊन दुपारी १२ वाजता भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमास भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री सद्गुरू हरिबुवा साधू देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.