दैनिक स्थैर्य | दि. १८ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांची पालखी पादुका परिक्रमा फलटणमध्ये सोमवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर, गजानन चौक येथे आगमन होणार आहे.
यावेळी सर्व भाविकांनी पालखी स्वागतासाठी हजर राहावे. स्वामींची पालखी व पादुका दर्शनाची वेळ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत राहील, असे श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, गजानन चौक यांनी आवाहन केले आहे.